भा.न्या.सं. कलम १४० (३) अन्वये गुन्हा नोंद; जिल्ह्यात २४ तासांत तीन अपहरणाच्या घटना
नवापूर येथील एका विवाहित महिलेचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केले. याप्रकरणी महिलेच्या पतीने नवापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, भा.न्या.सं. कलम १४० (३) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हेड कॉन्स्टेबल नरेश गुरव या प्रकरणाचा तपास करत आहेत.
-
- दुसरी घटना (धडगाव): धडगाव तालुक्यातील कुसुमवेरी येथील एका युवतीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केले. या संदर्भात युवतीच्या वडिलांनी धडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, भा.न्या.सं. कलम १४० (३) नुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेड कॉन्स्टेबल संजय माळी तपास करत आहेत.
- तिसरी घटना (सारंखेडा/शहादा): शहादा तालुक्यातील कोठली येथील भारतसिंग भवानसिंग गिरासे (वय ५७) यांचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केले. याप्रकरणी हितेश भारतसिंग गिरासे यांनी सारंखेडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, अज्ञात आरोपीविरुद्ध भा.न्या.सं. कलम १४० (३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक जितेंद्र ईशी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Follow Us:

