राज्यसभेसाठी द्विवार्षिक निवडणुकीची घोषणा

मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांकडून सात सदस्यांची राज्यसभेसाठी द्विवार्षिक निवडणूक घेण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. विज्ञापित नामनिर्देशन पत्र उमेदवाराला किंवा त्याच्या सूचकाला महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (३) तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विलास गो. आठवले, किंवा सह सचिव (समिती) तथा विशेष कार्य अधिकारी […]
राज्यसभेसाठी द्विवार्षिक निवडणुकीची घोषणा
Biennial elections for Rajya Sabha announced

मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांकडून सात सदस्यांची राज्यसभेसाठी द्विवार्षिक निवडणूक घेण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

विज्ञापित

नामनिर्देशन पत्र उमेदवाराला किंवा त्याच्या सूचकाला महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (३) तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विलास गो. आठवले, किंवा सह सचिव (समिती) तथा विशेष कार्य अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष नलावडे, किंवा अवर सचिव व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सीमा सचिन तांबे यांच्यापुढे ५ मार्च २०२६ पर्यंत (सार्वजनिक सुट्टी वगळता) सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० या वेळेत दाखल करता येतील. नामनिर्देशन पत्रे कक्ष क्रमांक ८०२, आठवा मजला, विधान भवन, बॅकबे रेक्लमेशन, मुंबई – ४०० ०३२ येथे स्वीकारण्यात येतील. त्याच ठिकाणी व वेळेत नामनिर्देशनपत्रे उपलब्ध राहतील.

नामनिर्देशन पत्रांची छाननी ६ मार्च २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता विधान भवन येथे करण्यात येणार आहे. उमेदवारी मागे घेण्याबाबतची लेखी सूचना ९ मार्च २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करता येईल.

निवडणूक लढविली गेल्यास मतदान १६ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.०० ते सायंकाळी ४.०० या वेळेत विधान भवन, बॅकबे रेक्लमेशन, मुंबई येथे होणार आहे.

ही अधिसूचना  महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (३) डॉ. विलास सो. आठवले यांनी प्रसिद्ध केली आहे.

विज्ञापित
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: