विज्ञापित

जन्मशताब्दी वर्षांनिमित्त शहिद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे देशभक्तीपर देखावा

नंदुरबार:-ए मेरे वतन के लोगो जरा आँख में भर लो पाणी. जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी. या गीतातून 84 वर्षापूर्वी नंदनगरीत बलिदान देणाऱ्या शहिदांच्या स्मृती गणेशोत्सवात जागविण्यात आल्या आहेत.
जन्मशताब्दी वर्षांनिमित्त शहिद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे देशभक्तीपर देखावा
birth-centenary-year-patriotic-display-by-shahid-shirishkumar-mitra-mandal

स्वातंत्र्यपूर्व लढ्यात ब्रिटिशांशी लढा देणाऱ्या हुतात्मा शिरीषकुमार मेहता आणि सहकाऱ्यांनी दिलेल्या बलिदानाचा देखावा बालवीर चौकात शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे साकारण्यात आला आहे.
प्रति वर्षाप्रमाणे  यंदाही शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे 44 वा गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. दरवर्षी  सांस्कृतिक, सामाजिक आणि देशभक्तीपर विषयांवर मंडळातर्फे देखावा सादर करण्यात येतो. हुतात्मा शिरीषकुमार मेहता यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे. यानिमित्त मंडळातर्फे हुतात्मा शिरीषकुमार मेहता आणि सहकाऱ्यांवर  ब्रिटीशांतर्फे गोळीबार झालेला  देखावा सादर  करण्यात आला आहे. याचबरोबर माणिक चौक स्मारकाची प्रतिकृती उभारण्यात आली असून या स्मारकात पाचही   बालवीरांचे छायाचित्र
दर्शविण्यात आले आहे. आकर्षक विद्युत रोशनाई आणि  देशभक्तीची मशाल प्रज्वलित करण्यात आली आहे. देशभक्तीपर गीतांनी
परिसर भारावून गेला आहे. 2023 च्या गणेशोत्सवात  जिल्हा पोलीस दलातर्फे मंडळाला तृतीय पारितोषिक देण्यात आले होते. सामाजिक, सांस्कृतिक, देशभक्तीपर  उपक्रमांची परंपरा मंडळाने कायम राखली आहे.

विज्ञापित

मंडळातर्फे पर्यावरणपूरक शाळू मातीचे गणराज विराजमान आहेत. विशेष म्हणजे मंडळातर्फे कुठलीही मिरवणूक, वाजंत्री, गुलाल वापर करण्यात येत नाही. पारंपरिक वाद्याला प्राधान्य दिले जाते. शुक्रवारी अनंत चतुर्दशीला गणरायास  निरोप देण्यात येईल. यंदाची जन्मशताब्दी  आरास संकल्पना मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे यांची आहे. ज्येष्ठ सल्लागार निवृत्त शिक्षक जी. एस. गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली
कार्याध्यक्ष संभाजी हिरणवाळे, गोपाल हिरणवाळे, काशिनाथ गवळी, धिरेन हिरणवाळे, विशाल हिरणवाळे परिश्रम घेत आहेत.

विज्ञापित
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: