दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा ३ जानेवारी २०२७ रोजी

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा २०२४ ही ३ जानेवारी २०२७ रोजी आयोजित करण्यात आली आहे.
दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा ३ जानेवारी २०२७ रोजी
Civil Judge Junior Division and Judicial Magistrate First Class Preliminary Exam on January 3, 2027

आयोगाने या परीक्षेसाठी जाहिरात क्रमांक ०१३/२०२६ अन्वये ३० एप्रिल २०२६ रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. तसेच २३ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या शुद्धिपत्रकान्वये उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात आले आहेत.ही परीक्षा राज्यातील छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नवी मुंबई आणि नागपूर या जिल्हाकेंद्रांवर घेण्यात येणार आहे. संबंधित उमेदवारांनी परीक्षेच्या दिनांकाची नोंद घ्यावी, असे आयोगामार्फत कळविण्यात आले आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: