देवरे विद्यालयात जागतिक हात धुवा दिनानिमित्त स्वच्छतेचा जागर

नंदुरबार:-आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय, विखरण येथे जागतिक हात धुवा दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये वैयक्तिक स्वच्छता व आरोग्याविषयी जनजागृती करण्यात आली.
देवरे विद्यालयात जागतिक हात धुवा दिनानिमित्त स्वच्छतेचा जागर
devre-vidyalayat-jagatik-hat-dhuva-dinanimitta-swachhatacha-jagar

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डी. डी. साळुंके, तर प्रमुख अतिथी म्हणून उपशिक्षिका डॉ.आर. आर. बागुल उपस्थित होत्या. डॉ. बागुल यांनी साबणाने हात धुण्याची योग्य पद्धत समजावून सांगत स्वच्छता हीच आरोग्याची गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन केले. मुख्याध्यापक साळुंके यांनी हात स्वच्छ धुण्याची सवय अनेक आजारांपासून संरक्षण करते, असे सांगून विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचवावा,असे आवाहन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची प्रतिज्ञा घेतली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.एच. गायकवाड यांनी केले, तर आभार ए.एस. बेडसे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: