के आर पब्लिक स्कूलच्या दक्ष शाहचे जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत उत्कृष्ट यश

नंदुरबार:-महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत के आर पब्लिक स्कूलच्या दक्ष शाह याने तीन स्पर्धांमध्ये पदके जिंकून शाळेचे नाव अभिमानाने उंचावले आहे.
के आर पब्लिक स्कूलच्या दक्ष शाहचे जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत उत्कृष्ट यश
Daksh Shah of K.R. Public School achieved remarkable success in the district-level swimming competition.

त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे तो विभागीय स्तरावरील जलतरण स्पर्धेसाठी निवडला गेला आहे.दक्ष शाहने 208 मीटर फ्रीस्टाइल आणि 50 मीटर फ्रीस्टाइल या स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदक प्राप्त केले. तर 100 मीटर फ्रीस्टाइल स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून रौप्यपदक पटकावले.
या यशामुळे दक्ष शाहची विभागीय स्तरावरील जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याच्या या कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष किशोर वाणी, उपाध्यक्ष सिद्धार्थ वाणी, प्राचार्य डॉ. छाया शर्मा, उपप्राचार्य, प्रशिक्षक मितेश शाह, योगेश बेदरकर, निशांक, रोहित तसेच विद्यार्थीमंडळाने त्याचे उत्स्फूर्त अभिनंदन केले.
यशस्वी कामगिरीसाठी दक्ष शाहचे मनःपूर्वक अभिनंदन! विभागीय स्पर्धेतही त्याला उत्तम यश मिळावे, अशी शाळेकडून शुभेच्छा व्यक्त करण्यात आली आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: