सहकारी साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन’ अन् उपपदार्थ निर्मिती धोरण; मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सहकारी साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन पॉलिसी’ आणि ‘उपपदार्थ निर्मिती धोरण’ निश्चित करण्याबाबत बैठक झाली. राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना पुढील गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी आणि शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत देण्यास मदत व्हावी, या उद्देशाने केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यात ही योजना लागू करण्यासंदर्भातील प्रस्ताव तात्काळ मंत्रिमंडळासमोर सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
सहकारी साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन’ अन् उपपदार्थ निर्मिती धोरण; मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश
Directives issued to submit a proposal to the Cabinet regarding ‘soft loans’ and a by-product manufacturing policy for cooperative sugar factories.

यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख आदी उपस्थित होते.
उपपदार्थ निर्मिती धोरणामुळे सौर ऊर्जा, सहवीज निर्मिती, इथेनॉल (1G), मल्टिफीड, 2G इथेनॉल, सीबीजी, हरित हायड्रोजन, बायो बिटुमिन, जैव रसायने आणि एसएएफ या घटकांच्या निर्मितीस गती मिळणार आहे.
सॉफ्ट लोन योजनेमुळे साखर कारखान्यांची आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होईल, शेतकऱ्यांचे एफआरपीचे पैसे वेळेत देणे शक्य होणार आहे. तसेच, येत्या गाळप हंगामाची पूर्वतयारी विनाअडथळा पूर्ण करता येईल.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250