महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आष्टे आणि महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रकला स्पर्धा
नंदुरबार:-महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आष्टे ता.नंदुरबार आणि महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रकला स्पर्धा घेण्यात आली या चित्रकला स्पर्धेत शाळेतील 50 विद्यार्थ्यांनी भाग घेऊन बक्षीस मिळवले.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक नेहा राजेंद्र हेमाडे, द्वितीय क्रमांक पायल गणेश कापसे, व तृतीय क्रमांक मयुरी छोटू गाठे प्राप्त केले. सदर कार्यक्रमासाठी संदीप धनगर सहाय्यक अभियंता श्रेणी 2 व उमेश वसईकर मोजणीदार पाटबंधारे उपविभाग नंदुरबार ही उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य ए बी पटेल हे होते, कार्यक्रमाचे नियोजन कला शिक्षक संतोष पाडवी यांनी केले याप्रसंगी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देण्यात आली कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
Follow Us:

