जिल्हा परिषद शाळा दलेलपुरला शिक्षणाधिकारी क्रांती अरसूड यांची भेट; विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे कौतुक!

तळोदा तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, दलेलपुर येथे नुकतीच शिक्षणाधिकारी क्रांती अरसूड मॅडम यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी प्रत्यक्ष वर्गांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तराची तपासणी केली आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीविषयी समाधान व्यक्त केले.
जिल्हा परिषद शाळा दलेलपुरला शिक्षणाधिकारी क्रांती अरसूड यांची भेट; विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे कौतुक!
education-officer-kranti-arsud-visits-zp-school-dalelpur-praises-student-quality
विद्यार्थ्यांशी संवाद व कौतुकाचा वर्षाव
विद्यार्थ्यांसोबत बसुन विद्यार्थ्यांशी अत्यंत आत्मीयतेने संवाद साधला. या अनौपचारिक संवादाने विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा उत्साह द्विगुणित झाला.
• इयत्ता पहिलीच्या चिमुकल्यांची चुणूक: इयत्ता पहिलीच्या वर्गाला भेट दिली असता मुलांना फुलांची नावे विचारली. चिमुकल्यांनी एकापाठोपाठ एक सर्व फुलांची नावे न अडखळता अचूक सांगितली. तसेच, शब्द वाचनाचा सराव घेतला असता मुलांनी अत्यंत आत्मविश्वासाने अचूक शब्द वाचून दाखवले.
• इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचे गणितीय कौशल्य: इयत्ता चौथीच्या वर्गात विद्यार्थ्यांनी दिलेल्या गणितीय क्रिया अत्यंत अचूक आणि जलद सोडवून दाखविल्या.
शैक्षणिक गुणवत्तेबद्दल समाधान
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, शिक्षकांचे शालेय कामकाज आणि शाळेतील शैक्षणिक वातावरण पाहून शिक्षणाधिकारी क्रांती अरसूड यांनी समाधान व्यक्त केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची ही प्रगती कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगीतले. शाळेसाठी ही भेट अत्यंत प्रेरणादायी ठरली असून, यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: