‘राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त नंदुरबार जिल्हा परिषदेत अभिवादन कार्यक्रम संपन्न!’
जिल्हा परिषद नंदुरबार मुख्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती अत्यंत उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली.
भारताला स्वातंत्र्याच्या शिखरावर नेणारे, सत्य आणि अहिंसेचे पुजारी राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच साधेपणा, प्रामाणिकपणा आणि ‘जय जवान, जय किसान’ या अजरामर नार्याचे जनक, खंबीर नेतृत्वाचे प्रतीक लाल बहादूर शास्त्रीजी यांच्या संयुक्त जयंती निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नमन गोयल यांच्या शुभहस्ते दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार व पुष्पगुच्छ अर्पण करण्यात आले. यानंतर उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून भावपूर्ण व विनम्र अभिवादन केले.
कार्यक्रमा दरम्यान उपस्थितांनी गांधीजींच्या सत्य, अहिंसा आणि स्वच्छतेच्या आदर्शांवर चालण्याचा तसेच शास्त्रीजींच्या देशभक्ती, शिस्त व निष्ठेचे काटेकोर पालन करण्याचा दृढ संकल्प केला. नंदुरबार जिल्ह्याच्या विकासासाठी आणि स्वच्छतेसाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प देखील यावेळी करण्यांत आला.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

