विज्ञापित

आमदार कार्यालयात श्रींची भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना

(नंदुरबार):-शिवसेनेचे नेते तथा आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या आमदार कार्यालयात त्याचप्रमाणे राम पॅलेस निवासस्थानी आणि नंदुरबार तालुका विधायक समितीचे चेअरमन तथा प्रसिद्ध उद्योगपती मनोज रघुवंशी यांच्या निवासस्थानी गणरायाचे थाटामाटात आगमन झाले.
आमदार कार्यालयात श्रींची भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना

नंदुरबार शहरासह सर्वत्र आज गणेश चतुर्दशीला गणपती बाप्पांचे आगमन झाले. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषाने भक्तीमय वातावरणात बाप्पा विराजमान झाले. शिवसेनेचे नेते तथा आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या आमदार कार्यालयात त्याचप्रमाणे राम पॅलेस निवासस्थानी आणि नंदुरबार तालुका विधायक समितीचे चेअरमन तथा प्रसिद्ध उद्योगपती मनोज रघुवंशी यांच्या निवासस्थानी विघ्नहर्ता गणरायांची विधिवत स्थापना करण्यात आली.
याप्रसंगी आ.चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्ष सौ. रत्ना रघुवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी, इंदिरा महिला सहकारी बँकेच्या चेअरमन सौ. कविता रघुवंशी, सौ.मेघा राम रघुवंशी, नगरसेवक यशवर्धन रघुवंशी, सौ. कल्याणी यशवर्धन रघुवंशी, थिया राम रघुवंशी, वीर राम रघुवंशी, पृथ्वीसिंह यशवर्धन रघुवंशी, देवांश यशवर्धन रघुवंशी उपस्थित होते.

विज्ञापित
विज्ञापित
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: