ई-चलन थकीत असल्यास खरेदी-विक्री आणि मालकी हस्तांतरण रखडणार; महा वाहतूक पोलिसांच्या पोर्टलवर अशी तपासा दंडाची स्थिती!
(नंदुरबार) थकीत ई-चलानच्या वसुलीसाठी सर्वोच्च न्यायालयाने कडक पावले उचलली असून, दंडाची रक्कम पूर्णपणे न भरल्यास संबंधित वाहन जप्त करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
- परिवहन पोर्टलवर ब्लॅकलिस्ट: थकीत दंड असलेल्या वाहनांना परिवहन विभागाच्या ‘परिवहन’ पोर्टलवर ब्लॅकलिस्ट (काळ्या यादीत) टाकण्यात येईल.
वाहनधारकांवर येणारे निर्बंध
- ब्लॅकलिस्ट झालेल्या वाहनांच्या ऑनलाइन सेवांवर निर्बंध येतील. त्यामुळे वाहनाच्या नोंदणी प्रमाणपत्राचे नूतनीकरण (RC Renewal), ड्युप्लिकेट आरसी, फिटनेस प्रमाणपत्र आणि पीयुसी (PUC) मिळवण्यात अडथळे येतील.
- अशा वाहनांच्या मालकी हस्तांतरावर (Transfer of Ownership) देखील निर्बंध येऊ शकतात. त्यामुळे वाहन खरेदी-विक्री करताना आधी थकीत चालानची खात्री करणे आवश्यक आहे.
आपल्या नावावरील ई-चलान कसे तपासणार?
- वाहनधारक महाराष्ट्र वाहतूक पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावर (mahatrafficechallan.gov.in) किंवा केंद्र सरकारच्या ई-चलान पोर्टलवर (echallan.parivahan.gov.in) जाऊन प्रलंबित चलन तपासू शकतात.
- यासाठी वाहन क्रमांक आणि चेसिस किंवा इंजिन क्रमांकाचे शेवटचे चार अंक टाकून दंडाची सद्यस्थिती पाहता येईल व तिथूनच ऑनलाईन भरणा करता येईल. नागरिकांनी कोणत्याही अनोळखी किंवा बनावट लिंकवर क्लिक करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
Follow Us:

