मौजे चापडी येथील देव नदी व वडफळी परिसरात,महाराष्ट्र -गुजरात सीमा,बेकायदेशीर अतिक्रमण

नंदुरबार:-जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील मौजे चापडी येथील देव नदी व वडफळी परिसरात, महाराष्ट्र -गुजरात सीमा, बेकायदेशीर अतिक्रमण केले असल्याची तक्रार अशोक तडवी यांनी कारवाई करणेबाबत तक्रार तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
मौजे चापडी येथील देव नदी व वडफळी परिसरात,महाराष्ट्र -गुजरात सीमा,बेकायदेशीर अतिक्रमण
illegal-encroachment-chapdi-maharashtra-gujarat-border

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील मौजे चापडी येथील रहिवासी देवराम सुकलाल मोरे यांनी, महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांच्या सीमेवरून वाहणाऱ्या देव नदीच्या मध्यभागी, (सेंटरवर) आणि जोड वडफळी परिसरात बेकायदेशीररित्या अतिक्रमण केले आहे, मालकी हक्काचा अभावः देवराम सुकलाल मोरे यांच्या नावावर सदर नदीपात्रातील जागेचा कोणताही अधिकृत सातबारा उतारा, मालकी हक्क किंवा शासनाचा कोणताही परवाना नाही, नदीपात्रात अतिक्रमणः सदर जागा पूर्णपणे नदीपात्राचा आणि शासनाच्या महसूल विभागाच्या अखत्यारीतील भाग आहे. असे असतानाही त्यांनी नदीच्या मध्यभागी अतिक्रमण करून नैसर्गिक प्रवाहास अडथळा निर्माण केला आहे.

सीमावर्ती भागः सदर ठिकाण महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांच्या सीमेवर असल्याने, येड होणारे अनधिकृत बांधकाम किंवा अतिक्रमण हे कायदेशीर आणि प्रशासकीय दृष्ट्‌या अत्यंत गंभीर आहे, तरी, आपण स्वतः किंवा आपल्या अधिनस्त महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत (तलाठी व मंडळ अधिकारी) सदर जागेची तात्काळ प्रत्यक्ष पाहणी व मोजणी करावी. देवराम सुकलाल मोरे यांनी केलेले बेकायदेशीर अतिक्रमण तात्काळ निष्कासित (हटवण्यात) यावे, आणि शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याबद्दल त्यांच्यावर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता अंतर्गत, योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी अशोक बोदया तडवी जिल्हा, उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी नंदुरबार यांनी तहसीलदार अक्कलकुवा यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: