जनजातीय गौरव सेवा सप्ताहानिमित्त शहादा येथे शासकीय दाखले वाटप शिबिराचे आयोजन!

(शहादा) जनजातीय गौरव दिवस व जनजातीय गौरव सेवा सप्ताहानिमित्त एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा आणि तहसील कार्यालय, शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने तहसील कार्यालय, शहादा येथे विविध शासकीय दाखले वाटप शिबिर तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
जनजातीय गौरव सेवा सप्ताहानिमित्त शहादा येथे शासकीय दाखले वाटप शिबिराचे आयोजन!
janjatiya-gaurav-seva-saptah-shahada-certificate-distribution-camp
       या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय दाखल्यांचे वाटप करण्यात आले. तसेच पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देऊन या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.
आदिवासी बांधवांसह सर्व पात्र नागरिकांपर्यंत शासकीय योजना व सेवा पोहोचविण्यासाठी अशा शिबिरांचे आयोजन महत्त्वपूर्ण ठरत आहे.
यावेळी मा.आमदार राजेश पाडवी, तहसीलदार संभाजी पाटील आदी उपस्थित होते.
शासनाच्या योजना, सेवा आणि सुविधांचा लाभ प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प!
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: