शहादा येथील व्यापाऱ्याची १७.८७ लाखांची फसवणूक; बरेलीला पाठवलेला २५० क्विंटल हरभरा ट्रक चालकाने परस्पर विकला

शहादा येथील 'आलोक ट्रेडर्स'चे मालक आलोक पुखराज जैन यांनी २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान उत्तर प्रदेशातील बरेली येथे पाठवण्यासाठी २५० क्विंटल ५० किलो हरभरा दिला होता.
शहादा येथील व्यापाऱ्याची १७.८७ लाखांची फसवणूक; बरेलीला पाठवलेला २५० क्विंटल हरभरा ट्रक चालकाने परस्पर विकला
Shahada trader cheated of Rs 17.87 lakh; truck driver sells 250 quintals of gram meant for Bareilly.
  • आरोपी ट्रक चालक: राजस्थानमधील धौलपूर जिल्ह्यातील ट्रक चालक रवींद्र गोविंदा (वय ३२, रा. कुदिन्ना गाव, ता. बाडी) याच्या ताब्यात ट्रक (क्रमांक आरजे ११ जीए ९४३६) मधून हा माल देण्यात आला होता. मात्र, त्याने माल इच्छित स्थळी न पोहोचवता स्वतःच्या फायद्यासाठी परस्पर विकून त्याचा अपहार केला.
  • पोलीस व न्यायालयीन कारवाई: याप्रकरणी शहादा न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर न्यायालयाने गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले. त्यानुसार शहादा पोलिसांनी फसवणूक आणि विश्वासघाताचा गुन्हा दाखल केला असून फौजदार विनोद पाटील पुढील तपास करत आहेत.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: