जनजातीय गौरव सेवा सप्ताहानिमित्त अक्कलकुवा येथे शासकीय दाखले वाटप शिबिराचे आयोजन!
(नंदुरबार) भगवान बिरसा मुंडा जयंती, जनजातीय गौरव दिन आणि जनजातीय गौरव सेवा सप्ताहानिमित्त एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा व तहसील कार्यालय, अक्कलकुवा यांच्या संयुक्त विद्यमाने तहसील कार्यालय, अक्कलकुवा येथे विविध शासकीय दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय दाखल्यांचे वाटप करण्यात आले. तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देऊन नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी मा. आमदार आमश्या पाडवी, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी लघिमा तिवारी, तहसीलदार विनायक घुमरे आदी उपस्थित होते.
शासनाच्या योजना आणि सेवा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प!
Follow Us:

