नंदुरबारमध्ये जनगणना-2027 च्या तयारीला वेग! 25 जानेवारीपासून प्रत्यक्ष लोकसंख्या शिरगणनेला सुरुवात

जनगणना-2027 च्या दुसऱ्या टप्प्यातील लोकसंख्या शिरगणनेच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील वीर बिरसा मुंडा सभागृहात 16 व 17 नोव्हेंबर रोजी दोन दिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले.
नंदुरबारमध्ये जनगणना-2027 च्या तयारीला वेग! 25 जानेवारीपासून प्रत्यक्ष लोकसंख्या शिरगणनेला सुरुवात
nandurbar-census-2027-preparations-population-enumeration-january-25
        या प्रशिक्षणात जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, मुख्याधिकारी तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना जनगणनेच्या कामकाजाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
महत्त्वाचे वेळापत्रक
▪️ 10 ते 24 जानेवारी 2027 – स्वयंगणना (Self Enumeration)\
▪️ 25 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2027 – प्रत्यक्ष लोकसंख्या शिरगणना
जनगणनेच्या कामासाठी प्रगणक व पर्यवेक्षकांची नियुक्ती, प्रशिक्षण, सीएमएमएस (CMMS) पोर्टलद्वारे ऑनलाइन कामकाज तसेच नागरिकांकडून 40 प्रश्नांच्या आधारे माहिती संकलन याबाबत सविस्तर मार्गदर्शन व प्रात्यक्षिक देण्यात आले.
        जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांनी जनगणनेचे काम अचूक, काळजीपूर्वक आणि विहित वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणेने दक्षतेने काम करण्याचे आवाहन केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी, जनगणना कार्य संचालनालयाचे सहायक संचालक अजय ठाकूर, श्रीकांत बनकर, नायब तहसीलदार रमेश वळवी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
अचूक जनगणना, सक्षम नियोजन आणि विकसित भारताच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल!
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: