राष्ट्रीय नवजात शिशु सप्ताह २०२६: लहान बाळे, मोठी क्षमता!
आपल्या देशाचे भविष्य घडवण्यात नवजात बालकांच्या आरोग्याला आणि सुरक्षिततेला सर्वोच्च स्थान आहे. ‘राष्ट्रीय नवजात शिशु सप्ताह २०२६’ च्या निमित्ताने, १५ ते २१ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत नवजात बालकांच्या विशेष संगोपनासाठी आणि त्यांच्या उज्वल भविष्यासाठी राज्यभर विविध उपक्रम राबवले जात आहेत.
या वर्षाची थीम (Theme)
“लहान बाळे, मोठी क्षमताः त्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी पाठपुरावा सेवेत गुंतवणूक करा”
(Small babies, big potential: Invest in follow-up care to protect their future)
सदयस्थिती आणि ध्येय:
• नवजात मृत्यू दर (NMR): २००५ मधील प्रति १,००० जिवंत जन्मांमागे २५ असलेला मृत्यू दर घटून २०२४ मध्ये १० वर आला आहे.
• सन २०३० चे ध्येय: भारत नवजात कृती आराखड्याअंतर्गत (INAP) सन २०३० पर्यंत नवजात मृत्यू दर आणि उपजत मृत्यू दर एकअंकी (Single Digit) आणण्याचे उद्दिष्ट आहे.
प्रमुख उपक्रम व सेवा:
• रुग्णालय व संस्थात्मक सुविधा: SNCU, NICU, NBSU आणि NBCC च्या माध्यमातून आजारी व कमी वजनाच्या बालकांसाठी उच्च दर्जाची विशेष काळजी व पुनरुज्जीवन सुविधा उपलब्ध.
• डिस्चार्ज नंतरचा पाठपुरावा: बालकांच्या आरोग्याचा सतत मागोवा घेणे, कांगारू मदर केअर (KMC), स्तनपान, योग्य पोषण आणि डोळे (ROP) व श्रवण तपासणी वेळेत पूर्ण करणे.
• समुदाय सहभाग: आशा, ANM आणि CHO यांच्यामार्फत उच्च-जोखमीच्या बालकांसाठी संयुक्त गृहभेटी व जनजागृती सत्रांचे आयोजन करणे.
चला, आपण सर्वजण मिळून प्रतिज्ञा करूया—प्रत्येक नवजात बालकाचे संगोपन सुरक्षित करूया आणि त्याचे भविष्य उज्ज्वल बनवूया!
Follow Us:

