तळोदा येथे महिला व बालविकास मंत्री मा.ना.अदिती तटकरे यांची ‘झोमॅटो सेंट्रल किचन’ला भेट; बालकांच्या पोषण आहाराची सखोल पाहणी!

बालकांचे आरोग्य, पोषण आणि सर्वांगीण विकास या बाबींना नेहमीच सर्वोच्च प्राधान्य देत, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री मा. ना. अदितीजी तटकरे यांनी नंदुरबार जिल्हा दौऱ्यादरम्यान तळोदा तालुक्यात सुरू असलेल्या ‘झोमॅटो सेंट्रल किचन’ला सदिच्छा भेट दिली.
तळोदा येथे महिला व बालविकास मंत्री मा.ना.अदिती तटकरे यांची ‘झोमॅटो सेंट्रल किचन’ला भेट; बालकांच्या पोषण आहाराची सखोल पाहणी!
WCD Minister Aditi Tatkare visits Zomato Central Kitchen in Taloda; inspects child nutrition meals!
       यावेळी त्यांनी या केंद्राच्या एकूण कामकाजाची तसेच बालकांसाठी तयार करण्यात येणाऱ्या दैनंदिन पोषण आहाराची सविस्तर पाहणी करून संपूर्ण प्रक्रियेची माहिती घेतली.राज्यातील प्रत्येक बालकापर्यंत दर्जेदार, सकस आणि पोषक आहार योग्य पद्धतीने व वेळेत पोहोचावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. या भेटीदरम्यान ना. तटकरे यांनी स्वयंपाकघरातील स्वच्छतेचे निकष, अन्नपदार्थांची गुणवत्ता, कच्च्या मालाचा दर्जा आणि अन्न वितरणाच्या व्यवस्थापनाचा बारकाईने आढावा घेतला. पोषण आहाराच्या बाबतीत कोणतीही तडजोड न करता उच्च दर्जा राखण्याबाबत त्यांनी संबंधित यंत्रणेला आवश्यक सूचना दिल्या.
      या पाहणी दौऱ्याप्रसंगी स्थानिक आमदार मा. आ. श्री. राजेशजी पाडवी, महिला व बालविकास आयुक्त श्रीम. माधवी सरदेशमुख, नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नमन गोयल आणि प्रकल्प अधिकारी श्रीमती लाघीमा तिवारी यांची प्रमुख उपस्थिती होती. यासोबतच महिला व बालविकास विभागाचे विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: