राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर आणि सह पोलीस आयुक्त दिपक साकोरे यांची पंचदीप बालगृहात दिवाळी

मुंबई: महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर आणि त्यांचे पती नवी मुंबई शहर पोलीस सहआयुक्त दीपक साकोरे यांनी पनवेल येथील खांदा कॉलनीत ‘पंचदीप बालग्राम संकुल’ येथे सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी बालगृहातील मुलांसमवेत वेळ घालवत त्यांच्याशी आपुलकीच्या वातावरणात मनमोकळा संवाद साधला.
राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर आणि सह पोलीस आयुक्त दिपक साकोरे यांची पंचदीप बालगृहात दिवाळी
MoS Meghana Sakore-Bordikar and Joint CP Deepak Sakore celebrate Diwali at Panchdeep Balgruha.

या वेळी राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर यांनी मुलांच्या शिक्षणाची, आरोग्याची तसेच त्यांना पुरवण्यात येणाऱ्या विविध सोयी-सुविधांची अत्यंत आस्थापूर्वक चौकशी केली. मुलांनीही राज्यमंत्री साकोरे- बोर्डीकर यांच्याशी संवाद साधत आपल्या दिनचर्येची व अभ्यासाची माहिती दिली. राज्यमंत्री बोर्डीकर यांनी सर्व मुलांना उत्तम शिक्षण घेऊन जीवनात यशस्वी होण्यासाठी मनापासून शुभेच्छा दिल्या.

कुमारी वैजयंती कदम हिचा विशेष सत्कार

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे पूर्वी बालगृहात राहिलेली विद्यार्थिनी वैजयंती कदमने कायद्याचे पदव्युत्तर शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर यांच्या हस्ते तिचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमास जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीकांत हावळे, सहाय्यक पोलीस आयुक्त भुजबळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढाकणे, पंचदीप बालग्रामच्या कार्याध्यक्ष मीनल टिपणीस, ‘वन स्टॉप सेंटर’च्या सरिता वाडेकर तसेच ‘१०९८ चाइल्ड हेल्पलाइन’च्या नीलाक्षी दगडे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी व बालगृहातील मुले उपस्थित होती.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: