नंदुरबारमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोफत हाडांच्या ठिसूळपणाची तपासणी; २५२ जणांनी घेतला शिबिराचा लाभ

(नंदुरबार) हाडांचा ठिसूळपणा वेळीच लक्षात आल्यास योग्य उपचार आणि काळजी घेणे शक्य होते. या उद्देशाने रेल्वे हॉस्पिटलमध्ये हे शिबिर घेण्यात आले, ज्यात रेल्वे कर्मचारी, त्यांचे नातेवाईक आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
नंदुरबारमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोफत हाडांच्या ठिसूळपणाची तपासणी; २५२ जणांनी घेतला शिबिराचा लाभ
Free bone density check-up camp for railway employees in Nandurbar; 252 benefit from the initiative
    • उद्घाटन व मान्यवरांची उपस्थिती. अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. सी. डी. महाजन यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष किरण पाटील, सचिव पंकज पाठक, वेस्टर्न रेल्वे मजदूर संघाचे नंदुरबार शाखाध्यक्ष रवींद्र पोतदार, वैद्यकीय अधिकारी डॉ. जयेश तबीयाड आणि रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
    • मार्गदर्शन व औषधोपचार. डॉ. सी. डी. महाजन यांनी हाडांच्या ठिसूळपणाची कारणे, लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपायांबाबत मार्गदर्शन केले. तज्ज्ञ धीरज माळी आणि शुभम दुबे यांनी २५२ जणांची तपासणी केली व हाडांचा ठिसूळपणा आढळलेल्या रुग्णांना औषधोपचार देण्यात आले.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: