
सात आरोग्य योद्ध्यांचा सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि प्रशस्तिपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला.आरोग्य भवन, मुंबई येथे आयोजित आढावा बैठकीदरम्यान दुर्गम भागातील आरोग्यसेवेची वस्तुस्थिती समोर आणणाऱ्या आणि आपल्या कार्यातून उल्लेखनीय परिणाम साधणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. बैठकीस आमदार चित्रा वाघ, आरोग्य आयुक्त डॉ. सुनिल भोकरे, संचालक डॉ. विजय कंदेवाड, आरोग्य विभागातील इतर वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
या सन्मानाचा उद्देश दुर्गम भागात कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावणे, त्यांच्या कार्याला सार्वजनिक मान्यता मिळवून देणे आणि इतर कर्मचाऱ्यांनाही प्रेरणा देणे हा आहे.
सन्मानित अधिकारी व कर्मचारी :
१. डॉ. गुणवंत कांबळे, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय मोलगी
२. डॉ. कांतीलाल पावरा, तालुका आरोग्य अधिकारी, धडगाव
३. डॉ. संतोष परमार, स्त्रीरोग तज्ज्ञ, ग्रामीण रुग्णालय धडगाव
४. डॉ. राहुल नायका, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र मांडवा
५. डॉ. हिमांशू चव्हाण, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र रोषमाळ खुर्द
६. चमेली भताने, अधिपरिचारिका, प्राथमिक आरोग्य केंद्र डाब
७. अंजना परमार, आरोग्य सेविका, तरंगता दवाखाना (बोट अॅम्ब्युलन्स), धडगाव















