वडपळी आश्रमशाळेत आरोग्य जनजागृती व समुपदेशन उपक्रम
‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत वडपळी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जनजागृती व समुपदेशन उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमात विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छता, साथीचे व सांसर्गिक आजारांपासून बचाव, तसेच किशोरवयीन मुला-मुलींच्या पौगंडावस्थेतील शारीरिक बदलांबाबत आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.
किशोरवयात होणारे शारीरिक व मानसिक बदल समजून घेणे, आरोग्यदायी सवयी अंगीकारणे आणि आजारांपासून प्रतिबंधात्मक काळजी घेणे याबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला.
आरोग्यदायी जीवनशैली, स्वच्छता आणि योग्य आरोग्यविषयक माहितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
Follow Us:

