लोकसंवाद कार्यक्रमात नगर परिषदेच्या विविध योजनांवर आधारित मार्गदर्शन; जिल्हा माहिती कार्यालयातर्फे सिद्धिविनायक बाल गणेश मंडळात लोकसंवाद कार्यक्रमाचे आयोजन
यावेळी नगरपरिषदेचे अधिकारी पंडीत मस्के यांनी गणेशोत्सवानिमित्त राबविण्यात येत असलेल्या लोकसंवाद व ‘सेवा संकल्प’ अभियान कार्यक्रमांतर्गत नागरिकांना विविध योजनांची माहिती दिली. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना (शहरी), स्वनिधी ते समृद्धी, दिव्यांग कल्याणकारी योजना, एकल महिला सर्वेक्षण-२०२६, रमाई आवास योजना, बचतगट स्थापना व त्यांचे संवर्धन यासह विविध महिलांना देण्यात येणाऱ्या योजनांचा समावेश आहे.
शासकीय योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी नागरिकांनी संबंधित योजनांची माहिती घेऊन आवश्यक कागदपत्रांसह हिंगोली नगरपरिषद कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमास गणेश मंडळाचे अध्यक्ष तथा पत्रकार कल्याण देशमुख, नगरपरिषदेचे अधिकारी, विजय रामेश्वर, श्री. नरवाडे, श्री. चव्हाण, स्वच्छता महिला कर्मचारी विविध मान्यवर, महिला, बालके तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकसंवादाच्या माध्यमातून शासकीय योजना व उपक्रमांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

