महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करा!

नंदुरबार महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित सेवा नागरिकांना विहित कालावधीत, पारदर्शक व कार्यक्षम पद्धतीने उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या नाशिक विभागाच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी दिले.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करा!
maharashtra-right-to-public-services-act-enforcement
        जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीबाबत आढावा बैठक झाली. यावेळी प्रलंबित अर्ज व अपिलांचा तातडीने निपटारा करणे, सेवा नाकारताना लेखी आदेश देणे, तसेच शक्य त्या सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
‘आपले सरकार सेवा पोर्टल’ वरील सेवांची माहिती अद्ययावत ठेवून नागरिकांकडून अभिप्राय घेण्यावर भर देण्याचे निर्देशही देण्यात आले. जिल्ह्याचे मानांकन व Citizen Score वाढविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले.
अक्कलकुवा तालुक्याचाही आढावा घेण्यात आला. नागरिकांचे प्रलंबित दाखले तातडीने देऊन लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत सर्व प्रकरणे विहित कालावधीत निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आल्या.
वेळेत सेवा • पारदर्शक प्रशासन • नागरिकांचा हक्क
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: