विवाह प्रमाणपत्र डिजिटल स्वाक्षरीसह डिजिलॉकरवर; शासकीय कामांसाठी ठरणार उपयुक्त
(नंदुरबार) नोंदणी व मुद्रांक विभागाने विवाह नोंदणीच्या संगणक प्रणालीचे डिजिलॉकर (DigiLocker) ॲपशी एकत्रीकरण केले आहे. त्यामुळे आता नागरिकांना त्यांचे विवाह प्रमाणपत्र थेट मोबाईलवर उपलब्ध होणार आहे
- डिजिटल स्वाक्षरीयुक्त प्रत: डिजिलॉकरवर मिळणारे विवाह प्रमाणपत्र अधिकृत आणि डिजिटल स्वाक्षरीयुक्त असणार आहे. सर्च डॉक्युमेंट्स पर्यायात जाऊन ‘मॅरेज सर्टिफिकेट’ शोधून आणि आवश्यक तपशील भरून हे प्रमाणपत्र सहज डाउनलोड करता येईल.
- गेल्या ३ वर्षांचा डेटा समाविष्ट: विवाह नोंदणीची प्रक्रिया गेल्या तीन वर्षांपासून ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. त्यामुळे या तीन वर्षांच्या कालावधीत नोंदणी झालेल्या विवाहांच्या प्रमाणपत्रांचा या सुविधेत समावेश करण्यात आला आहे.
- नागरिकांना होणारे फायदे: यामुळे कागदपत्रे हरवण्याची चिंता मिटेल. तसेच ऐनवेळी जुनी फाईल शोधण्याची किंवा प्रमाणपत्राच्या नवीन प्रतीसाठी शासकीय कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज पडणार नाही. नागरिकांना कुठूनही ही डिजिटल प्रत मिळवता येईल.
Follow Us:

