विज्ञापित

निसर्गाची हिरवी संजीवनी ! मोलगी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांनी उलगडला आदिवासी रानभाज्यांचा औषधी खजिना

अक्कलकुवा (विशेष प्रतिनिधी): आधुनिक जीवनशैली आणि फास्टफूडच्या युगात आपल्या पूर्वजांचा पारंपारिक, सकस आहार मागे पडत चालला असतानाच, अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथील आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी एका अनोख्या उपक्रमातून आदिवासी आहार संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित केले. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा यांच्या मार्गदर्शनाखाली अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा मोलगी येथे 'रानभाज्या महोत्सवा'चे रंगतदार आयोजन करण्यात आले होते.
निसर्गाची हिरवी संजीवनी ! मोलगी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांनी उलगडला आदिवासी रानभाज्यांचा औषधी खजिना
molgi-ashram-school-ranbhaji-mahotsav-tribal-food-culture-akkalkuwa

या महोत्सवाचे उद्घाटन मोलगीच्या सरपंच ज्योती तडवी यांच्या हस्ते झाले. प्रकल्प अधिकारी लाघिमा तिवारी आणि सहायक प्रकल्प अधिकारी प्रभात गायकवाड यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमात दामा वसावे, गुलाब वसावे, लता जैन यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

विज्ञापित

पारंपरिक वेशभूषा आणि औषधी गुणधर्मांचे सादरीकरण

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते पारंपरिक आदिवासी वेशभूषेत सजलेले विद्यार्थी. मुख्याध्यापिका ज्योती तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी परिसरातील डोंगर-दऱ्यांतून विविध रानभाज्यांचा मोठा संग्रह गोळा केला होता. केवळ भाज्या मांडून न थांबता विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने त्या भाज्यांची स्थानिक बोलीभाषेतील नावे, वनस्पतीशास्त्रीय नावे आणि त्यातील दुर्मीळ औषधी व आयुर्वेदिक गुणधर्म माहिती फलकांच्या माध्यमातून उपस्थितांसमोर मांडले.

रानभाज्यांचे वैविध्य पाहून थक्क झाले ग्रामस्थ

महोत्सवात डोडबे, उखिवडो, बांबूचे कोम, शेवग्याची पाने, कंटुर्ले, अंबाडो, लाल पेंडो, खाटो पेंडो, हेलटो, पाथरीची भाजी, आघाडा, माटलो, पोवाड्या, पेबडे आणि लाल भेंडी अशा निसर्गात विनामूल्य मिळणाऱ्या अत्यंत पौष्टिक रानभाज्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. स्थानिक जैवविविधतेची ओळख नव्या पिढीला व्हावी आणि भावी पिढीने या वनस्पतींचे संवर्धन करावे, हा उद्देश माध्यमिक मुख्याध्यापक राहुल पाटील यांनी प्रास्ताविकातून मांडला.

हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी राजश्री चौधरी, विलास मराठे, सचिन नाथजोगी यांच्यासह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री चौधरी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार निशा वळवी यांनी मानले.

विज्ञापित
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: