एकलव्य विद्यालय व ज.ग.नटावदकर कनि.महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांच्या किशोरवयीन आरोग्य या विषयावर कार्यक्रम
विद्येची देवी सरस्वती यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. हरपाल जाधव समुपदेशक, एच आय व्ही. एड्स विभाग, सिव्हिल हॉस्पिटल नंदुरबार, हे या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांना सरांनी मार्गदर्शन करून शंकांचे निरसन केले महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई यांच्या सौजन्याने राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आय इ सी कॅम्पेन जिल्हास्तरावर सर्वत्र राबवण्यात येत आहे. यात शाळेच्या विद्यार्थ्यांना एचआयव्ही एड्स संवेदीकरण करणे या बाबत आय इ सी विभागाकडून आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. यात आपल्या शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी यांना किशोरावस्था, किशोरवयीन आरोग्य, लैंगिक आरोग्य, मानसिक आरोग्य समस्या, मादक पदार्थांच्या दुरुपयोग अशा विविध विषयासंदर्भात माहिती देण्यात आली. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक धर्मेंद्र मराठे, उपमुख्याध्यापक गिरीश पवार, पर्यवेक्षक टीका पाडवी तसेच ज्येष्ठ शिक्षक मिलिंद वडनगरे, वसंत वसईकर, सुनील पाटील, श्रीमती किरण रघुवंशी
यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक श्रीमती किरण रघुवंशी यांनी केले.

