विज्ञापित

आत्मविश्वासाने घडवा स्वतःचे भविष्य! महिला महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’; संभाषण कौशल्याच्या जोरावर स्वावलंबनाची नवी दिशा

(नंदुरबार) "स्वतःवरचा विश्वास आणि प्रभावी संभाषण कौशल्य हीच कोणत्याही यशाची खरी किल्ली असते. तरुणींनी आपल्या मनातील संकोच आणि न्यूनगंड बाजूला सारून स्वतःला घडवले पाहिजे," असा प्रेरणादायी संदेश हिस्कणी फाउंडेशनच्या अध्यक्षा चेतना गोस्वामी यांनी दिला. येथील स्थानिक महिला महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने 'आत्मनिर्भर युवती अभियान' कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
आत्मविश्वासाने घडवा स्वतःचे भविष्य! महिला महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’; संभाषण कौशल्याच्या जोरावर स्वावलंबनाची नवी दिशा
nandurbar-mahila-college-atmanirbhar-yuvati-abhiyan-empowerment

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील कुवर उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून हिस्कणी फाउंडेशनच्या अध्यक्षा चेतना गोस्वामी, परीक्षा विभाग प्रमुख प्रा. एस. जी. साळुंके आणि सहल विभाग प्रमुख प्रा. बी. एफ. चव्हाण व्यासपीठावर उपस्थित होते.

विज्ञापित

नोकरी आणि व्यवसायासाठी संभाषण कौशल्य गरजेचे

विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना चेतना गोस्वामी म्हणाल्या की, सद्यःस्थितीत स्वावलंबी होण्यासाठी नोकरी आणि व्यवसाय हे दोन महत्त्वाचे मार्ग उपलब्ध आहेत. मात्र या दोन्ही क्षेत्रांत यशस्वी व्हायचे असल्यास व्यक्तिमत्त्व विकास आणि संभाषण कौशल्य (Communication Skills) अत्यंत आवश्यक ठरते. स्वतःमधील सुप्त गुणांना ओळखून आत्मविश्वासाने आलेल्या संधीचे सोने करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थिनींना केले.

सकारात्मक दृष्टीने स्वतःमध्ये बदल घडवा: डॉ. सुनील कुवर

प्राचार्य डॉ. सुनील कुवर यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थिनींना प्रेरक कानमंत्र दिला. महाविद्यालयात होणारा प्रत्येक उपक्रम हा स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवण्याची आणि नवीन काहीतरी शिकण्याची सुवर्णसंधी असते; त्यामुळे विद्यार्थिनींनी सक्रियपणे यात सहभागी व्हावे, असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. मधुकर देसले यांनी केले, तर प्रा. रोशन जहाँ यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रा. सुमित्रा शेप यांनी केले आणि शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. दीपक मोरे यांनी मानले. या कार्यक्रमाने उपस्थित तरुणींमध्ये एक नवा आत्मविश्वास आणि स्वावलंबनाची नवी उमेद निर्माण केली.

विज्ञापित
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: