विज्ञापित

शब्दांची जादू अन् कलागुणांचा आविष्कार! डॉ. काणे गर्ल्स हायस्कूलमध्ये हिंदी दिनानिमित्त विविध स्पर्धांचा रंगला जल्लोष; विजेत्यांवर कौतुकाचा वर्षाव

(नंदुरबार) "भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून विचारांना अभिव्यक्त करणारे प्रभावी साधन आहे," याचा प्रत्यय नंदुरबार एज्युकेशन सोसायटी संचलित डॉ. काणे गर्ल्स हायस्कूलमध्ये आला. हिंदी दिनाचे औचित्य साधून शाळेमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. घोषणावाक्य, सुंदर हस्ताक्षर, हिंदी काव्यवाचन, कथाकथन, वक्तृत्व आणि निबंध अशा वैविध्यपूर्ण स्पर्धांतून विद्यार्थिनींनी आपल्या सुप्त कलागुणांना उत्तम वाव दिला.
शब्दांची जादू अन् कलागुणांचा आविष्कार! डॉ. काणे गर्ल्स हायस्कूलमध्ये हिंदी दिनानिमित्त विविध स्पर्धांचा रंगला जल्लोष; विजेत्यांवर कौतुकाचा वर्षाव
dr-kane-girls-high-school-hindi-diwas-competition-nandurbar

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे पर्यवेक्षक मिलींद चव्हाण होते. व्यासपीठावर मुख्याध्यापिका सीमा मोडक, संजय चौरे, रेखा गोसावी, जितेंद्र पगारे, चंद्रशेखर चौधरी, गणेश चौधरी आणि कल्याणी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी उपशिक्षक जितेंद्र पगारे, सीमा गावीत व शांताराम पाटील यांनी सुंदर कविता सादर करून विद्यार्थिनींची दाद मिळवली.

विज्ञापित

विविध स्पर्धांतील विजेत्यांची नामावली:

  • घोषवाक्य स्पर्धा (इयत्ता ५ वी): प्रथम – प्रांजल चव्हाण, द्वितीय – स्वरा गिरासे, तृतीय – कनिष्का प्रसाद.

  • सुंदर लेखन स्पर्धा (इयत्ता ६ वी): प्रथम – नेहा गांगुर्डे, द्वितीय – समृद्धी ठाकरे, तृतीय – ज्योती मोरे.

  • काव्यवाचन स्पर्धा (इयत्ता ७ वी): प्रथम – गायत्री माळी, द्वितीय – राधिका चौधरी, तृतीय – निरमा जांगिड.

  • कथाकथन स्पर्धा (इयत्ता ८ वी): प्रथम – नूपुर गिरासे, द्वितीय – वैष्णवी धनगर, तृतीय – ज्योत्स्ना गावीत, उत्तेजनार्थ – आराध्या गावीत.

  • वक्तृत्व स्पर्धा (इयत्ता ९ वी): प्रथम – सोनाक्षी परदेशी, द्वितीय – दक्षता पाटील व निकिता चव्हाण, तृतीय – अश्विनी बिरारे व धारिका शिरसाठ, उत्तेजनार्थ – पलक ढिवरे.

  • निबंध स्पर्धा (इयत्ता १० वी): प्रथम – माधवी मोरे व दिव्या तांबोळी, द्वितीय – सोनाक्षी गांगुर्डे व निरंकारी अहिरे, तृतीय – जान्हवी धनगर व सोनाक्षी बावा.

सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. स्पर्धांचे परीक्षण जितेंद्र पगारे, चंद्रशेखर चौधरी, गणेश चौधरी व कल्याणी पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन संजय चौरे यांनी केले, बक्षीस यादीचे वाचन जितेंद्र पगारे यांनी केले तर आभार प्रदर्शन चंद्रशेखर चौधरी यांनी मानले.

विज्ञापित
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: