महावितरणच्या ‘सेवा सेतू’ व ‘सेवा संकल्प अभियानाला प्रतिसाद
सेवा संकल्प अभियान अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात विशेष सेवा कक्ष सुरू करण्यात आले. नंदुरबार तहसील कार्यालयात कोकण प्रादेशिक कार्यालयाचे प्रभारी सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले, अधीक्षक अभियंता सायस दराडे, नंदुरबारचे तहसीलदार संतोष डेरे, कार्यकारी अभियंता अतुल गायधनी यांच्या प्रमुख उपस्थितीत सेवा कक्षात ग्राहकांना विविध योजनांची माहिती देण्यात आली. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रू
सेवा सेतू अभियानात नवीन घरगुती वीजजोडणी देणे, नादुरुस्त रोहित्र विनाविलंब बदलून देणे, वीज बिलावरील नावात बदल करणे, मंजूर भार बदलणे, बिलिंगविषयक तक्रारींचे निवारण करणे, प्रलंबित तक्रारींचे निवारण तसेच विद्युत सुरक्षेसाठी वीज यंत्रणेमध्ये आवश्यकतेनुसार स्पेसर बसवणे, इतर तांत्रिक उपाययोजना, वीजयंत्रणेची देखभाल व दुरुस्ती आदींना वेग देण्याचे निर्देश क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले. सेवा सेतू व सेवा संकल्प अभियानात एकाच छत्राखाली उपलब्ध सर्व सेवा व सुविधांचा ग्राहकांनी लाभ घेतला.

