बनावट गुलाल कारखान्यावर पोलिसांची धाड! होळ शिवारात ४३० गोण्यांसह अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त
नंदुरबार शहरातील होळ शिवारात दहिदुहेळेकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या गोडाऊनमध्ये बेकायदेशीरपणे चालवल्या जाणाऱ्या बनावट गुलाल निर्मिती कारखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) पथकाने छापा टाकला
या कारवाईत ४३० गोण्यांमधील भेसळयुक्त गुलालासह २ लाख ५४ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
संशयित आरोपी कोणत्याही अधिकृत परवान्याशिवाय डोलोमाईट पावडरमध्ये घातक रासायनिक रंग आणि मिक्सरचा वापर करून फिकट व गडद गुलाबी रंगाचा बनावट गुलाल तयार करत होता. हा बनावट गुलाल ‘सनफ्लॉवर ब्रँड’ या नावाने बाजारपेठेत विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आला होत. प्रमाणीकरण नसलेला हा गुलाल डोळ्यात, त्वचेवर किंवा श्वासाद्वारे शरीरात गेल्यास गंभीर आजार होण्याचा मोठा धोका निर्माण झाला होता
विज्ञापित
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:
- ४३० गोण्या बनावट गुलाल: रु. ८४,०००
- २० गोण्या डोलोमाईट पावडर: रु. २,०००
- इतर रंगांच्या गुलालाच्या गोण्या: रु. ६,०००
- गुलाल तयार करण्याचे २ इलेक्ट्रॉनिक मिक्सर: रु. १,२०,०००
- इलेक्ट्रॉनिक वजनकाटा व पॅकिंग मशिनरी: रु. ५,२५०
- १०० रिकाम्या प्लास्टिक गोण्या: रु. ५००
- एकूण जप्ती: रु. २,५४,५००
गुन्हा दाखल व पोलीस कारवाई:
पोलीस अंमलदार शशीकांत राजपूत यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सागर मणिलाल खंडेलवाल (रा. सरगम कॉलनी, गिरीविहार गेट, नंदुरबार) याच्याविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(२) व २८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र जाधव करत आहेत.
ही कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, हेकॉ. दिनेश पिंपळे, मुकेश सावळे, दिनेश वसूले, सुनील येलवे, विनोद पाटील, रवींद्र अहिरे, हेमंत बारी, राहुल पाडवी, विशाल मराठे व अभय राजपूत यांच्या पथकाने केली
विज्ञापित
Follow Us:

