जिल्ह्यात दुष्काळाची छाया गडद; पावसाची ५२% तूट, कापसासह खरिपाची पिके धोक्यात!
नंदुरबार जिल्ह्यात यंदा सुरुवातीपासूनच पावसाने हुलकावणी दिली असून पावसाच्या मोठ्या खंडामुळे पिकांची वाढ पूर्णपणे खुंटली आहे सरासरी पावसाने अद्याप पन्नाशी ओलांडलेली नसून जिल्ह्यात पावसाची तब्बल ५२ टक्क्यांपर्यंत तूट नोंदवण्यात आली आहे
परिणामी नदी-नाले अद्यापही कोरडे ठाक असून शेतकरी आणि नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत
परिणामी नदी-नाले अद्यापही कोरडे ठाक असून शेतकरी आणि नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत
जलसाठा आणि पिकांची सद्यस्थिती:
- कमी पाणीसाठा: जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये अद्यापही सरासरी केवळ ४२ टक्केच जलसाठा शिल्लक राहिला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा साठा ७० टक्क्यांपर्यंत पोहोचला होता.
- कापूस पिकाला मोठा फटका: जिल्ह्यात सर्वाधिक लागवड होणाऱ्या सुमारे १ लाख ३५ हजार हेक्टर क्षेत्रावरील कापूस आणि इतर खरिपाची पिके पावसाअभावी पिवळी पडू लागली आहेत.
- रब्बी हंगामावर धोक्याची घंटा: विहिरी आणि सिंचन प्रकल्पांतील पाणीसाठा अपुरा असल्याने आगामी रब्बी पिकांच्या आवर्तनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून रब्बी हंगामासाठी धोक्याची घंटा वाजली आहे.
अवघ्या दोन तालुक्यांत ५० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस:
जिल्ह्यातील नवापूर आणि धडगाव हे दोन तालुके वगळता इतर सर्वच तालुक्यांमध्ये सरासरी ३० ते ४९ टक्केच पाऊस झाला आहे. वेळेवर पाऊस न झाल्याने खतांचा आणि मशागतीचा खर्च वाया जाण्याची भीती व्यक्त होत असून शेतकरी हवालदिल झाले आहेत
विज्ञापित
Follow Us:

