महिला खून प्रकरणातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा (शहादा अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील शिरुड दिगर येथे २०२० मध्ये घडलेल्या एका खळबळजनक महिला खून प्रकरणात शहादा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
महिला खून प्रकरणातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा (शहादा अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल
accused-in-womens-murder-case-sentenced-to-life-imprisonment-shahada-court
  • मुख्य आरोपी: श्रीराम काळू ऊर्फ काळ्या शेवाळे (वाघे) (रा. कुढावद, ता. शहादा).
  • वाद व घटना: आरोपी श्रीराम हा आपल्या कुटुंबासह शिरुड दिगर येथील मूरसिंग तिरसिंग भिल यांच्याकडे पाहुणा म्हणून आला होता. आरोपीने त्याची पत्नी सिंधूबाई हिला बाहेरगावी मजुरी कामासाठी जाण्यास सांगितले. पत्नीने नकार दिल्यामुळे त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले.
  • मध्यस्थी व खून: दुसऱ्या दिवशी पहाटे आरोपी श्रीराम हा पत्नीला मारहाण करत असताना, कोकीळाबाई मूरसिंग भिल ही महिला मध्यस्थी करण्यासाठी आणि भांडण सोडवण्यासाठी गेली. याचा राग येऊन आरोपी श्रीराम शेवाळे याने कोकीळाबाई यांच्या डोक्यावर लाकडी थापीने गंभीर मारहाण केली आणि तो घटनास्थळावरून पसार झाला.
  • मृत्यू: गंभीर जखमी झालेल्या कोकीळाबाई यांना उपचारासाठी शहादा येथील रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
न्यायालयीन कारवाई आणि शिक्षा
  • पोलीस तपास: शहादा पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी अधिकारी एम. रमेश यांनी या गुन्ह्याचा तपास करून तात्काळ पुरावे गोळा केले व न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
  • न्यायालयीन निकाल: अतिरिक्त सत्र न्यायाधीश १ अ.वि. गुजराथी यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड. यशवंतराव मोरे यांनी काम पाहिले.
  • शिक्षा: सबळ पुराव्यांच्या आधारे गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने आरोपी श्रीराम शेवाळे याला भादंवि कलम ३०२ अन्वये दोषी ठरवून जन्मठेप आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: