“एकलव्य विद्यालय,नंदुरबार येथे ई-कचरा संकलन”

नंदुरबार:-इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वाढता वापर आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर निर्माण होणारा ई - कचरा, याची योग्य विल्हेवाट लावणे हा एक गंभीर प्रश्न बनला आहे.
“एकलव्य विद्यालय,नंदुरबार येथे ई-कचरा संकलन”
nandurbar-ekalavya-school-e-waste-collection

यामुळे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी ‘नंदुरबार डेव्हलपमेंट समिट’ यांच्या पुढाकारातून नंदुरबार शहरातील एकलव्य विद्यालय, येथे ई – कचरा संकलन व जनजागृती अभियान राबवण्यात आले. या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा तथा महाराष्ट्र राज्य PCPNDT सल्लागार समितीच्या सदस्या डॉ. समिधा नटावदकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. सोबत एकलव्य विद्यालय तथा ज. ग. नटावदकर  कनिष्ट महाविद्यालयाचे प्राचार्य धर्मेंद्र मराठे, उपप्राचार्य डॉ. गिरीश पवार, पर्यवेक्षक टी. एन. पाडवी, संस्थेचे विज्ञान विभाग प्रमुख मिलिंद वडनगरे, ज्येष्ठ शिक्षक वसंत वसईकर, सुनील पाटील आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात मान्यवरांकडून वियार्थ्यांनी आणलेल्या ई – कचऱ्याचे संकलन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल भावसार व आभार प्रदर्शन संदीप पाटील यांनी केले.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: