दीपोत्सवाने उजळली नंदुरबारची बाजारपेठ; व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये पारंपरिक चोपडा पूजन संपन्न!

यंदा नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आल्यामुळे नागरिकांमध्ये दुप्पट उत्साह दिसून आला. घरांवर, दुकानांवर आणि कार्यालयांवर आकर्षक विद्युत रोषणाई तसेच पारंपारिक आकाशकंदील आणि पणत्या लावण्यात आल्या होत्या.
दीपोत्सवाने उजळली नंदुरबारची बाजारपेठ; व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये पारंपरिक चोपडा पूजन संपन्न!
Nandurbar Markets Illuminated by Deepotsav; Traditional Chopda Pujan Held Across Commercial Establishments!
  • बाजारपेठेत मोठी गर्दी: लक्ष्मीपूजनाच्या पूजेच्या साहित्यासाठी (उदा. केळीचे खांब, झेंडूची फुले, नारळ, लक्ष्मीची मूर्ती आणि केरसुणी) नंदुरबारच्या मुख्य बाजारपेठेत सकाळपासूनच नागरिकांची प्रचंड लगबग होती. बाजारात झेंडूची फुले ५० रुपये किलो दराने विकली गेली. सुभाष चौक, मंगळ बाजार, सराफ बाजार आणि कापड बाजारात कपडे, वाहने, मोबाईल व दागिन्यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली.
  • चोपडा पूजन व आतिषबाजी: व्यापारी व दुकानदारांनी आपापल्या प्रतिष्ठानांमध्ये सायंकाळी शुभमुहूर्तावर पारंपरिक पद्धतीने चोपडा पूजन (वही पूजन) व लक्ष्मी देवीची आरती केली. रात्री लहान-मोठ्यांनी फटाके फोडून दिवाळीचा आनंद लुटला.
  • आमदार कार्यालयात लक्ष्मीपूजन: नंदुरबार येथील शिवसेना भवन आमदार कार्यालयात लक्ष्मीपूजन सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख आ. चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, माजी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी, उद्योजक आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: