राणापूर येथे लाकडी डेंग्याने मारहाण, एकाचा मोबाईल लंपास; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

तळोदा तालुक्यातील राणापूर येथील रहिवासी कृष्णा अजबसिंग वळवी यांना ही मारहाण करण्यात आली असून, ते यात जखमी झाले आहेत.
राणापूर येथे लाकडी डेंग्याने मारहाण, एकाचा मोबाईल लंपास; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
Assault with Wooden Stick and Mobile Phone Snatched at Ranapur; Case Registered Against Four!
  • घटना: चार जणांनी लाकडी डेंग्याने (लाकडी दांडक्याने) कृष्णा वळवी यांच्या डोक्यावर मारहाण करून त्यांना जखमी केले. तसेच रणजीत सयाजी वसावे यांचा १२०० रुपये किमतीचा जिओ (Jio) कंपनीचा मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून नेला.
  • गुन्हा दाखल व आरोपी: याप्रकरणी कृष्णा अजबसिंग वळवी यांनी तळोदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पितांबर गोविंद वसावे, तानाजी (पूर्ण नाव माहिती नाही, रा. शिर्वे, ता. तळोदा) आणि इतर दोन अनोळखी अशा एकूण चार जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०४(१)(२), ११८(१), ३५१(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: