रामपूर गावाच्या विकासात आणखी एक पाऊल, पेव्हर ब्लॉक रस्त्याच्या कामाला सुरुवात
या रस्त्याचे भूमिपूजन दिनांक 3 नोव्हेंबर 2026 रोजी वसंत महाराज यांच्या शुभहस्ते नारळ फोडून करण्यात आले. भूमिपूजना नंतर प्रत्यक्ष रस्त्याच्या कामालाही सुरुवात करण्यात आली. अविनाश छगन नाईक यांच्या घरापासून ते दासू महाराज यांच्या घरापर्यंत हा पेव्हर ब्लॉक रस्ता तयार करण्यात येणार आहे. या रस्त्यामुळे परिसरातील नागरिकांची ये-जा अधिक सुलभ होणार असून ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य कल्पना यांच्यासह अविनाश नाईक, अमरसिंग वळवी, विकास नाईक, हसन वळवी, रविंद्र वळवी, विलास पाडवी, विका पाडवी, राहस्या नाईक, सुनील वळवी, विलास नाईक, मनिषाबाई वळवी, सानूबाई वळवी आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावाचा विकास आणि ग्रामस्थांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हेच ध्येय ठेवून सरपंच दीपक वळवी यांच्या प्रयत्नातून रामपूर गावाच्या विकासकामांना गती मिळत असून या नव्या रस्त्याच्या कामामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

