विद्यार्थ्यांनी प्रत्येकी एक रुपया गोळा करून स्वयंपाकी मावशींना दिली दिवाळीची साडी भेट

तळोदा:-दिवाळीचा सण म्हणजे आनंद, प्रेम, आपुलकी आणि माणुसकीचा संदेश देणारा सण. याच भावनेतून माध्यमिक विद्यालय लाखापूर येथील विद्यार्थ्यांनी एक स्तुत्य व प्रेरणादायी उपक्रम राबविला. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याने प्रत्येकी एक रुपया गोळा करून शाळेतील स्वयंपाकी मावशींना दिवाळीनिमित्त साडी भेट दिली.
विद्यार्थ्यांनी प्रत्येकी एक रुपया गोळा करून स्वयंपाकी मावशींना दिली दिवाळीची साडी भेट
Students pool ₹1 each to gift Diwali saree to school cook

विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने एकत्र येत हा छोटासा, पण मनाला स्पर्श करणारा उपक्रम राबविला. विद्यार्थ्यांच्या या कृतीतून कृतज्ञता, सामाजिक बांधिलकी, सहकार्य आणि श्रमप्रतिष्ठा या मूल्यांचे दर्शन घडले. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी प्रेमाने व आपुलकीने भोजन तयार करणाऱ्या स्वयंपाकी मावशींप्रती आदर व्यक्त करण्याचा हा एक सुंदर प्रयत्न ठरला. या उपक्रमामुळे स्वयंपाकी मावशींना आनंदाचा क्षण अनुभवता आला. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे शाळा परिसरातून कौतुक होत असून, दिवाळीच्या निमित्ताने जपलेली ही माणुसकीची भावना सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. लहानशा योगदानातून मोठा आनंद निर्माण होऊ शकतो, हा संदेश या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी दिला.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: