Home नंदुरबार जिल्हा जिल्हा प्रशासन व प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या संयुक्त सहभागातून नंदुरबार जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी...

जिल्हा प्रशासन व प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या संयुक्त सहभागातून नंदुरबार जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी नवीन दिशा

0
New direction for quality education in Nandurbar district through joint participation of District Administration and Pratham Education Foundation

नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLN) क्षमतांमध्ये सुधारणा घडवून आणणे, गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे तसेच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, नवोपक्रम व सर्जनशीलता विकसित करण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपक्रम राबवत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी दिनांक २३ व २४ जुलै २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या विविध शैक्षणिक उपक्रमांना भेट देऊन सविस्तर आढावा घेतला.

🏫 भेटीदरम्यान Foundational Literacy and Numeracy (FLN) सुधारणा, STEM Lab व Maker Space उभारणी, शिक्षक क्षमता विकास (Teacher Capacity Building), अभिनव अध्यापन पद्धती, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक विचारसरणी विकसित करण्यासाठी राबविण्यात येणारे उपक्रम तसेच समुदाय सहभागावर आधारित शिक्षण मॉडेलचा अभ्यास करण्यात आला.

👩‍🏫 यावेळी शिक्षकांचे सातत्यपूर्ण प्रशिक्षण, वर्गातील अध्यापन अधिक प्रभावी करण्यासाठी क्षमता विकास, FLN आधारित अध्यापन नियोजन, मूल्यमापन पद्धती तसेच विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा, सर्जनशीलता आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करण्यासाठी STEM आधारित शिक्षण अधिक प्रभावीपणे राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली.

🤝 जिल्हा प्रशासन आणि प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त सहभागातून अंगणवाडी ते प्राथमिक शाळांपर्यंत FLN बळकटीकरण, शिक्षक प्रशिक्षण, STEM Labs, Maker Spaces, विद्यार्थी-केंद्रित शिक्षण, नवोपक्रम आणि समुदाय सहभाग या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढविण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. तसेच नंदुरबार जिल्ह्यात या उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संयुक्त कृती आराखडा तयार करण्याबाबत सहमती दर्शविण्यात आली.

🌱 प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण, मजबूत पायाभूत शिक्षण, वैज्ञानिक दृष्टीकोन आणि भविष्याभिमुख कौशल्ये उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग आणि प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या समन्वयातून शिक्षण क्षेत्रात प्रभावी उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

#Education#FLN#NIPUNBharat#STEMEducation#MakerSpace#TeacherCapacityBuilding#PrathamEducationFoundation#Nandurbar#DistrictAdministration#DrMittaliSethi#GovernmentOfMaharashtra