कृषिपंपांना योग्य क्षमतेचे कॅपॅसिटर बसवून वीज यंत्रणेवरील भार कमी करा; महावितरणचे शेतकऱ्यांना आवाहन

(नंदुरबार) कृषिपंपांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि वीज वितरण यंत्रणेवरील अनावश्यक ताण कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या कृषिपंपांना योग्य क्षमतेचे कॅपॅसिटर बसवावेत, असे आवाहन महावितरणने केले आहे.
कृषिपंपांना योग्य क्षमतेचे कॅपॅसिटर बसवून वीज यंत्रणेवरील भार कमी करा; महावितरणचे शेतकऱ्यांना आवाहन
reduce-load-on-power-system-by-installing-proper-capacity-capacitors-on-agricultural-pumps-mahavitaran-appeals-to-farmers
  • कॅपॅसिटरचे महत्त्व आणि फायदे: अनेक कृषिपंपांचा पॉवर फॅक्टर कमी असल्याने वीजवाहिन्या, केबल आणि रोहित्रांवर (ट्रान्सफॉर्मर) अतिरिक्त प्रवाहाचा भार पडतो. योग्य क्षमतेचा कॅपॅसिटर बसवल्यास स्थानिक पातळीवर रिऍक्टिव्ह पॉवरची भरपाई होऊन पॉवर फॅक्टर सुधारतो आणि यंत्रणेतील विद्युत हानी कमी होते.
  • योग्य क्षमतेची निवड आवश्यक: प्रत्येक कृषिपंपासाठी एकाच क्षमतेचा कॅपॅसिटर योग्य ठरत नाही. मोटारीची अश्वशक्ती (HP), विद्युत जोडणीचा प्रकार आणि तांत्रिक गरज लक्षात घेऊनच कॅपॅसिटर निवडावा. चुकीच्या क्षमतेचा कॅपॅसिटर बसवल्यास मोटार आणि इतर विद्युत उपकरणांना धोका पोहोचू शकतो.
  • तज्ज्ञांकडूनच बसवून घ्यावे: शेतकऱ्यांनी मोटारीला कॅपॅसिटर बसवण्यासाठी स्वतः पुढाकार घ्यावा आणि सुरक्षिततेसाठी परवानाधारक विद्युत तज्ज्ञांकडूनच (इलेक्ट्रिशियन) तो बसवून घ्यावा, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: