शहादा तालुक्यातील उंटावद येथे वैकुंठ चतुर्दशीनिमित्त रोकडमल हनुमान यात्रोत्सव उत्साहात संपन्न; दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

शहादा तालुक्यातील उंटावद येथील साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या पुरातन रोकडमल हनुमान मंदिरात वैकुंठ चतुर्दशीनिमित्त भव्य यात्रोत्सव उत्साहात पार पडला असून, पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
शहादा तालुक्यातील उंटावद येथे वैकुंठ चतुर्दशीनिमित्त रोकडमल हनुमान यात्रोत्सव उत्साहात संपन्न; दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी
rokadmal-hanuman-yatra-utavad-shahada-vaikuntha-chaturdashi-devotees-crowd
  • धार्मिक विधी व गर्दी: पहाटे ५ वाजता धार्मिक पूजाविधीला सुरुवात होऊन महारुद्र पूजा, हनुमान चालीसा पठण, गणेश पूजन व महाआरती पार पडली आणि प्रसादाचे वाटप करण्यात आले. यात्रेत नवस फेडणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असल्याने त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती.
  • सुविधा व पोलीस बंदोबस्त: गोमाई व सुसरी नद्यांच्या संगमावर असलेल्या या मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यात्रेनिमित्त मंदिर परिसरात हॉटेल्स, रसवंती, पूजेचे साहित्य व मनोरंजनाची साधने दाखल झाली होती. ग्रामपंचायतीमार्फत स्वतंत्र वाहनतळाची सोय, मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विजय पाटील व पदाधिकाऱ्यांकडून भाविकांसाठी आवश्यक सुविधा, तर उपविभागीय पोलीस अधिकारी गुलाबराव पाटील व पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
  • उपस्थित मान्यवर: याप्रसंगी आमदार राजेश पाडवी, दीपक पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटील यांच्या हस्ते आरती करण्यात आली. तसेच माजी जि.प. सभापती कंचन पाटील, उपनगराध्यक्षा माधवी पाटील, माजी नगराध्यक्ष अशोक बागुल, नगरसेवक ज्ञानेश्वर चौधरी, राजेंद्र पटेल, संतोष वाल्हे, कल्पेश पटेल, सभापती सुनील पाटील, संचालक मोतीलाल जैन, हेमराज पवार, विनोद जैन, गणेश पाटील व इतर मान्यवर आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: