नंदुरबार शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत; जयचंद नगरमध्ये झुंडीच्या हल्ल्यात सात वर्षीय बालक गंभीर जखमी

नंदुरबार शहरातील जयचंद नगर परिसरात कॉलनीमध्ये खेळणाऱ्या एका सात वर्षीय बालकावर भटक्या कुत्र्यांच्या झुंडीने अचानक जीवघेणा हल्ला केला असून, या हल्ल्यात बालकाच्या चेहऱ्यावर व तोंडावर गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नंदुरबार शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत; जयचंद नगरमध्ये झुंडीच्या हल्ल्यात सात वर्षीय बालक गंभीर जखमी
stray-dog-menace-nandurbar-7-year-old-boy-seriously-injured-jaychand-nagar
  • वाढती दहशत व पूर्वीच्या घटना: नंदुरबार शहरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गेल्या महिन्यातही एकाच प्रभागातील १० जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची घटना घडली होती, तसेच शहरात अनेक किरकोळ घटना सातत्याने घडत आहेत.
  • अतिसंवेदनशील भाग: शहरातील सराफा बाजार, जळका बाजार, संजयनगर, सिंधी कॉलनी, धुळे रोडवरील ज्ञानदीप सोसायटी आणि गोपाळनगर या भागांत भटक्या कुत्र्यांची समस्या सर्वाधिक गंभीर आहे.
  • प्रशासनाविरोधात संताप व आंदोलनाचा इशारा: पालिकेने कुत्र्यांच्या नसबंदीचा ठेका दिलेला असूनही कुत्र्यांची संख्या कमी होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. केवळ निर्बीजीकरणावर अवलंबून न राहता पालिकेने कुत्र्यांना जेरबंद करून त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा काही सामाजिक संघटनांनी दिला आहे.
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: