Home आरोग्य मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीतील पाण्याचे तपासणीसाठी घेण्यात आलेले नमुने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या...

मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीतील पाण्याचे तपासणीसाठी घेण्यात आलेले नमुने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते

1
Samples collected for testing the water from the drinking water tank at Mantralaya were sent to the Maharashtra Jeevan Pradhikaran laboratory.

दवाखान्यातील डॉक्टरांशी संपर्क साधण्यात आला असून, त्यांच्या माहितीनुसार सध्या केवळ तुरळक स्वरूपातील काही रुग्ण आढळत आहेत. याबाबतचा लेखी अहवाल लवकरच प्राप्त होणार आहे. तसेच, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राबविण्यात आलेल्या स्वच्छता उपाययोजनांची पाहणी करण्याची विनंती कर्मचारी संघटनेला करण्यात आली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून, आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबविण्यात येत आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे.

#मंत्रालय

#पाणीपुरवठा

#स्वच्छपाणीपुरवठा