मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांची प्राथमिक आरोग्य केंद्र राजबर्डी येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल (भा.प्र.से.) यांनी धडगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, राजबर्डी येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आणि कामकाजाचा आढावा घेतला.
अभियानांतर्गत उपक्रमांची पाहणी व आढावा
या भेटीदरम्यान ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचा आणि उपचारात्मक सेवांचा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सविस्तर आढावा घेतला. त्यांनी आरोग्य केंद्रातील:
• प्रसुतीगृह (Labor Room)
• शस्त्रक्रिया गृह (Operation Theatre)
• शीतयंत्र कक्ष (Cold Chain Room – लस साठवणूक)
• औषध भांडार (Pharmacy Store)
या सर्व महत्त्वाच्या कक्षांना प्रत्यक्ष भेट देऊन तिथल्या स्वच्छता, औषध साठा आणि उपलब्ध सुविधांची पाहणी केली.
शेवटच्या घटकापर्यंत सेवा पोहोचवण्याचे दिलेत निर्देश.
आरोग्य केंद्रामार्फत ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सेवांचा आढावा घेत असताना, “समाजातील शेवटच्या घटकापर्यंत उत्तम आणि दर्जेदार आरोग्य सेवांचा लाभ पोहोचला पाहिजे,” असे स्पष्ट निर्देश नमन गोयल यांनी दिले. यासाठी त्यांनी तेथील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले व सतर्कतेने काम करण्याचे आवाहन केले.
अधिकारी व कर्मचारी उपस्थिती.
या पाहणी दौऱ्याप्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्र राजबर्डीचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, तसेच आरोग्य यंत्रणेतील विविध क्षेत्रीय अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Follow Us:

