पी. के. पाटील विद्यालयात संस्कृत दिन उत्साहात साजरा

नंदुरबार येथील हिरा रुस्तवी चौधरी प्रतिष्ठान संचलित सहकार महर्षी श्री. अण्णासाहेब पी. के. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संस्कृत दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
पी. के. पाटील विद्यालयात संस्कृत दिन उत्साहात साजरा
Sanskrit Day Celebrated with Enthusiasm at P. K. Patil Vidyalaya

मुख्याध्यापक अनिल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी संस्कृत गीत, गणेश वंदना, सरस्वती वंदना, गुरुवंदना तसेच रामरक्षा स्तोत्रातील श्लोकांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ क्रीडा शिक्षिका वेतना चौधरी होत्या. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250