सेवा संकल्प अभियानातून काकर्दे येथे मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर

नंदुरबार :भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष निलेश भाऊ माळी ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मनोज गायकवाड ओबीसी मोर्चा जिल्हा कार्यकारिणी सदस्य कल्पेश माळी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील दत्तात्रय खालाणे भेटू माळी देविदास माळी विठोबा माळी सागर माळी समाधान माळी शालिक ठाकरे इत्यादी उपस्थित होते
सेवा संकल्प अभियानातून काकर्दे येथे मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर
seva-sankalp-abhiyan-kakarde-free-health-checkup-blood-donation-camp

      भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चा, जिल्हा नंदुरबार तसेच मुख्यमंत्री सहायता कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत काकर्दे येथे मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर रविवार, २७ सप्टेंबर २०२६ रोजी विठ्ठल मंदिर चौक, काकर्दे, ता. जि. नंदुरबार येथे आयोजित करण्यात आले होते. शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देतानाच रक्तदानासाठीही नागरिकांना प्रोत्साहन देण्यात आले.भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चा, जिल्हा नंदुरबार तसेच मुख्यमंत्री सहायता कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत काकर्दे येथे मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

seva-sankalp-abhiyan-kakarde-free-health-checkup-blood-donation-camp

        या उपक्रमाचे आयोजन ओबीसी मोर्चा नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून करण्यात आले. आयोजकांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आरोग्य तपासणी करून घेण्याचे तसेच रक्तदानाच्या सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले होते.

       ‘जनसेवा ते देशसेवा’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश सामाजिक व आरोग्यविषयक सेवांना चालना देणे हा असल्याचे प्रसिद्धीपत्रकातील माहितीत नमूद करण्यात आले आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: