शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीत वर्ल्ड फार्मसिस्ट दिनानिमित्त रक्तदान शिबिर

नंदुरबार:-शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामडोद, नंदुरबार यांच्या वतीने National Pharmacy Welfare Association (India) यांच्या सहकार्याने 24 सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. “Give Blood, Give Hope, Give Life” या संदेशातून रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीत वर्ल्ड फार्मसिस्ट दिनानिमित्त रक्तदान शिबिर
shatabdi-institute-of-pharmacy-world-pharmacist-day-blood-donation-camp

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. अमरदीप अरुणकुमार महाजन, प्राचार्य, New High School and Shri S. L. Mali Junior College of Arts and Science, तळोदा, जि. नंदुरबार यांनी रक्तदानाचे महत्त्व, त्याची सामाजिक गरज आणि रक्तदानामुळे गरजू रुग्णांना मिळणारी मदत याबाबत उपस्थितांना माहिती दिली. युवकांनी रक्तदानासारख्या सामाजिक उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. पंकज एम. चौधरी यांनी शिबिरामागील उद्देश व विद्यार्थ्यांमध्ये रक्तदान आणि सामाजिक बांधिलकीबाबत जनजागृती करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. संस्थेचे सचिव गणेश गोविंद पाटील व अध्यक्षा योगिता गणेश पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: