शिवसेनेतर्फे जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशींच्या हस्ते आनंदाच्या शिधा वाटप

नंदुरबार:-शिवसेना शिंदे गटाच्या वतीने जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांच्या हस्ते होळतर्फे हवेली गावात दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आणि गरजूंना आनंदाच्या शिधा वाटप करण्यात आले 1972 नंतर राज्यात भीषण दुष्काळ पडला
शिवसेनेतर्फे जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशींच्या हस्ते आनंदाच्या शिधा वाटप
shivsena anand shidha distribute

शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी आनंदाचा शिधा देण्यात येत आहे. नंदुरबार तालुक्यातील होळ तर्फे हवेली गावात जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांच्या हस्ते शेतकऱ्यांना आणि गरजूंना आनंदाच्या शिधा वाटप करण्यात त्यात जीवनावक्षक खाद्य वस्तूंच्या समावेश आहे.
याप्रसंगी शेतकरी संघाचे अध्यक्ष बी.के पाटील, नगरसेवक रवींद्र पवार, सरपंच मनीष नाईक, सामाजिक कार्यकर्ते विकास पवार, ग्रामपंचायत सदस्य सुशीलाबाई नाईक, भावना ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते नईम भील, राजेश कोतवाल, मुकेश नाईक यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: