श्री काकासाहेब प्राथमिक विद्यामंदिरात गोकुळाष्टमी उत्साहात साजरी

नंदुरबार:-हिरा प्रतिष्ठान संचलित श्री काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी प्राथमिक विद्यामंदिरात गोकुळाष्टमीच्या निमित्ताने दहिहंडी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
श्री काकासाहेब प्राथमिक विद्यामंदिरात गोकुळाष्टमी उत्साहात साजरी
shri-kakasaheb-prathamik-vidyamandirat-gokulashtami-utsahat-sajri

विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण वातावरणात गोकुळाष्टमी सोहळा सादर केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यामंदिराचे मुख्याध्यापक युवराज भामरे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी भगवान श्रीकृष्ण व राधेच्या वेशभूषेत सहभागी होत गोकुळाष्टमीचा सुंदर सोहळा सादर केला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गरबा नृत्याने तसेच कृष्णभजनाच्या जयघोषाने संपूर्ण वातावरणाने भारून गेले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व वर्गशिक्षक, शिक्षिका तसेच विद्यामंदिर येथील शिक्षकेचर सहकारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250